Thursday, June 24, 2010

गोरखगडच्या वाटेवर...

२० जून सकाळच्या ६.३० ची बस पकडायची ह्या हिशोबाने उठून तयारी केली, आज आमचा दौरा होता "गोरखागडला" चा..सकाळी नेहमीप्रमाणे पावसाच वातावरण होतं, पण पडत नव्हता पण सकाळी थंड वातावरण होता थोडं.आम्ही १६ जण होतो.सकाळी सकळी दिसणारी हिरवळ खूपच छान दिसते,थंड लागणारी हवा मन प्रसन्न करून जातं. आम्ही मुरबाडला ७.४५ला पोहोचलो,तिथून आम्ही देहरी ह्या गावात जायला गाडी केली होती.२० मिन्ताच्या वाटेवरून जातानाच समोर मच्छिंद्रगड आणि गोरखगड दिसतो ,सकाळी पावसाचे ढग त्या गडांना भिडत होते ,त्या धुक्यात दिसणारे ते गड मला कॅमेरात बंदिस्त करण्याचा मोह आवरू शकले नाहीत . आम्ही २० मिनटात देहरी गावात पोहोचलो, सकळी मस्त गरम गरम भजी,वडापाव ह्यावर तव मारून आम्ही गड चढायला सुरुवात केली,पण जस जस गड चढायला सुरुवात केली थंड वातावरण कमी कमी होत घामाच्या धारा वाहायला सुरुवात झाली होती ,वार्याचा लवलेशही आम्हला तासभर जाणवत नव्हता .थोडाफार पाऊस पडून गेल्यामुळे वाढलेल्या झाडांच्या आणि गवताच्या वाटेवरून जाताना वाटत अपना घनदाट रानातून जात आहोत म्हणून... मुख्य दरवाज्यापाशी पोहोचल्यावर तिथे पाण्याच्या दोन-तीन टाक्या लागतात त्यांनतर थोड्याश्या पायर्या चढल्यावर आम्ही गोरखगडाच्या गुहेपाशी येऊन पोहोचलो .समोर हिरवळीने दाटलेला ढगांनी वेढलेला आणि समोरून भयाण दरी असा मधोमध मच्छिंद्रगड तुमचा सारं लक्ष वेधून घेतो .बराचवेळ मच्छिंद्रगडच्या सानिद्ध्यातही जाव असा तुम्हला क्षणभर वाटावं इतका तो सुंदर दिसतो. त्या नंतर आम्ही थोडी विश्रांती घेतली. गोरखगड हा त्याच्या माथ्यावर चाध्ल्याशिवाय पूर्ण होत नाही ,एक साधारण १० मिनिटाच्या पायर्या चढून आम्ही वर जात असताना थोडासा वळून मागे पहिले तर संपूर्ण हिरवळीने दाटलेली दरी बघितली आणि आणि वरती चढून गेलो .आणि तिथे तुम्हाला भिडणारा थंड वारा,समोरून निसर्गाच्या सान्निध्यात दिसणाऱ्या आणि ढगांच्या दाटीवाटीने वेढलेला नाणे घाट,सिद्धगड आणि मच्छिंद्रगड बघून तिथून पाय निघत नव्हते. त्याठिकाणी आम्हीपण "ग्लोबल वार्मिंग ची थोडीशी जण ठेऊन एक छोटासा रोपट आमच्या ट्रेकची आठवण म्हणून लावलं . त्यांनतर परत गुहेत आल्यावर मस्तपैकी जेऊन थोडी विश्रांती घेऊन आम्ही परतीच्या वाटेवर निघालो ..संध्याकाळी ५ ला आम्ही परत देहरी गावात पोहोचलो आणि परत मागे वळून बघितले आणि रोप किती वाढल्यावर इथे यायचा ह्या विचाराने पुन्हा गाडीत बसलो

Wednesday, June 16, 2010

"एक cutting "

" एक cutting दे रे मित्रा" मस्त पाऊस सुरु झाला आणि चहाच्या टपर्यांची गर्दी वाढली, रस्त्याच्या टोकाला उभे राहून ciggrate ओढत ओढत सगळेजण cutting मारतात,पाऊस फक्त बहाणा असतो म्हणा,पण लगेच collegeche दिवस आठवले थोडा जरी पाऊस सुरु झाला तरी भिजण्यासाठी अनेक निमित्त काढून मी आणि माझी मैत्रीण फिरायला निघायचो,संध्याकाळी मित्रं-मैत्रिणी सगळे भेटायचो आणि चहाच्या tapariver आमचा मोर्च्या असायचा आम्हा सगळ्यांचा ,सकाळी सकाळी कॉलेजजवळ चहाच्या अनेक cutting व्हायची ,आज ह्याच्याशी पैज ,आज ह्याच्याकडून cutting आहे रे सगळ्यांना असा म्हणायच्या आवकाश आणि सगळ्यांचा घोळका व्हायचा आजूबाजूला ,फुकटातली cutting घेण्यासाठी सगळे कायम तयार असायचे ,भर पावसात मस्त मक्याचा कणीस खायला पण सगळेजण १०-१५ रुपयेपण मोजून मोजून काढायला लागायचे ,contribution काढून कांदा भजी आणि मुग भजीच्या गाडीवर जायचो ,कधी कधी पावसात ice -creame खायला पण मजा यायची ..........
collegechi खूप आठवण येते अशा दिवसात आता कोणाला contribution काढायची गरज नाही पडत ,पण आजकाल सगळ्यांना भेटायला वेळ खूप खर्ची होतो आणि त्यासाठी contribution पण नाही काढता येत....
अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो छान पावसात मित्रांना सगळ्या call करून जमा टपरीवर आणि एक cutting मारा ,आणि पूर्वीच्या आठवणी काढत काढत नवीन आठवणी तयार करा