Friday, July 30, 2010

मैत्री...

"लक्षात ठेव दोस्ता,तुला मी हवा आहे म्हणूनच मला तू हवा आहेस " वपुर्झा मधलं वाक्य आहे.आयुष्यात प्रत्येक नात गरज म्हणून नसत पण मैत्रीची गरज कायम असते ,ज्यात सगळी नाती तुम्हाला अनुभवायला मिळतात.छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणं ,रुसवे फुगवे,थट्टा-मस्करी ,आणि न सुटणाऱ्या गुंतागुंतीच पण प्रेमळ नातं असतं.पण त्यात गरजेपुरती असणारी मैत्री नको.
बरेच जण असा म्हणतात कि "A Friend in need a Friend indeed " पण मला असा वाटत त्यानंतर ती गरज टिकवून ठेवणं ती मैत्री.बर्याच जणांच्या आयुष्यात असे क्षण येतात कि त्याला खरच एका आधाराची गरज असते त्यावेळी आधार बनणं ती मैत्री आणि तोच आधार सतत गरज बनत जाण तीपण मैत्रीच.
सगळ्याच गर्दीला आपलंसं करता येत नाही आणि सगळ्या गर्दीत आपण सामील होऊ शकत नाही काहीजण असा करूही शकतात पण ते स्वतःचा स्वार्थ म्हणून करतात.ते कधीच मैत्री जाणू शकत नाहीत.आपला मार्ग आपण निवडायचा आहे.मैत्रीत आलेले क्षण कसे टिपून ठेवायचे ,कसे जपायचे,आणि कसे टिकून ठेवायचे, गरज असताना आधार देण कि आधाराची गरज असताना ती शोधण का आधाराची गरज असताना जी सोबत मिळाली आहे ती कायम जपून ठेवणं.

Happy Friendship Day

Sunday, July 18, 2010

माझे श्रद्धास्थान......

सकाळी ट्रेनमध्ये ऐकलं अगं आज अंगारखी चतुर्थी नाही का? म्हणून titwalyala जाऊन आले दर चतुर्थीला जाते ना मी, हे ऐकून वाटलं अरे लोकांची किती श्रद्धा आहे?दर वेळी न चुकता हि बाई जाते वा छान,पण नंतरच तिचा वाक्य ऐकून माझा लगेच लोक किती बाउ करतात ह्या गोष्टींवरचा विश्वास ह्या बाईने कायम ठेवला,ती म्हणाली सकाळी titwalyala जायचा घाईत "मी सकाळी देवाला नमस्कार करायचा विसरूनच गेले" लोकांना घरातल्या देवासमोर ५ मिनिट उभे राहून नमस्कार करायला वेळ नाही मग हे मंदिरात जाऊन स्वतः किती श्रद्धाळू आहेत असा का दाखवतात किंवा हे असं करून देव पाऊ शकतो? मला तर असं वाटत कि लोक मानसिक समाधानापेक्षा नवस बोलण्यासाठी वा काही ना काही मागण्यासाठी देवस्थानांना भेटी देतात.लोक ह्या ना त्या जोतीष्यांकडे जाऊन त्यांनी सांगितलेले उपाय म्हणून आणि बरेच वेळा स्वतःसाठी काही ना काही मागण्यासाठी मंदिरात जातात पण काही काही लोक मानसिक समाधानासाठी अशा श्रद्धास्थानी जाऊन येतात पण आजकाल ह्या तीर्थस्थानी लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला जातो हे कितपत योग्य आहे?लालबागचा राजा असो,शिर्डी असो,तिरुपती असो,मुंबईचा सिद्धिविनायक असो लोकांना १०-१२ तास खिळवत ठेवलं जातं ५ मिनटांच्या दर्शनासाठी,VIP line ,मुखदर्शन,आणि फक्त पाया पडण्यासाठी आलेले लोक ह्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या आणि लांबलचक रांगा लागलेल्या असतात .हे सगळं कशासाठी?कोणासाठी? देवाला भेटण्यासाठी का स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी? का हि संस्थान चालवण्यासाठी? का स्वतःच्या मानसिक समाधानासाठी?

आज तुम्ही तुमच्या देवघरात एकदा निरखून बघा हि एवढी संस्थान आहेत तेवढे सगळे देव तुमच्या समोर असताना तुम्ही तुमची वाट अशी का बदलता? मला असं म्हणायचा नाहीये कि देवळात जाऊन तरी काय होता ?तुमच्या इच्छेने तुम्ही देव माना,मनापासून माना,आज ह्या गुरुजींनी सांगितला म्हणून आज ह्या देवळात जातेय /जातोय ,हे अस सांगितल्यावर यश तुमच्या पदरात पडेल ?तुमच्या देवघरात जो गणपती आहे तोच सिद्धिविनायकला आहे,तोच गणपतीपुळ्याला आहे आणि तोच लालबागचा राजा आहे,फक्त तुमचा श्रद्धास्थान तुम्ही निवडायचा आहे
मला इथे आस्तिक-नास्तिक हा मुद्दा अजिबात उभा करायचा नाहीये. मला इथे ह्या श्रद्धास्थानानी मांडलेल्या लोकांच्या श्रद्धेच्या बाजाराची चीड आहे.
देव कधी सांगत नाही मला हे हव आहे ते हवा आहे ,पण आपापल्या परीने आणि आपापल्या मनापासून असलेल्या श्रद्धेने जे काही लोक देवासाठी करतात त्याच्या बाजार मांडला जाऊन नये एवढंच माझं म्हणणं आहे .ह्यानंतर तुम्ही तुमचं श्रद्धास्थान निवडायचा आहे.

Saturday, July 17, 2010

दिवस असे कि......

college सोडून साधारण १-२ वर्ष तरी सगळेजण college च्या आठवणीमध्ये जगत असतात,काहीजण पुढे शिकत असतात ,तर काहीजण कुठेतरी job शोधून join होतात ,तिथे नवीन relations तयार होतात,त्यांना अगदी कंटाळा येईपर्यंत वा पाठ होईपर्यंत आपण college चे किस्से सांगून सांगून कंटाळा आणतो.पण college नंतर होणारे relations हे एक वेगळाच अनुभव देऊन जातात,मुंबईमध्ये सकाळी तासभरपण घरात जात नाही,नेहमीची train पकडायची घाई असते त्याच मूळ कारण traincha group,तास-दीडतास त्यांच्याबरोबर काय आपला आयुष्य आहे धावपळीचा हे रोज बोलण्यात जातो,पण असाच आयुष्य हवं असा मनात बोलतो,ऑफिसमध्ये कोण कोणाच्या ओळखीचा नसून नंतर एकत्र ऑफिसला जाण,एकत्र डबा खाणं हे सुरुवातीचा आयुष्य असता ,पण ह्याच आयुष्यात काही जणांचे इतके ऋणानुबंध चांगले होऊन जातात,घरच्यांच्या वाटयला आपण कमी असतो पण हे सगळे जण आपल्यासोबत दिवसभर असतात ,आज हे असा झालं आज तसं झालं ऑफिसमधल्या चांगल्या वाईट ह्या अनुभवापासून ते कधी कधी वैयक्तिक आयुष्यात होणार्या आयुष्याच्या आढावा एकमेकांशी नकळत आपण बोलायला लागतो ,एकाचा problem हा आपल्या सगळ्यांचा आहे असंच समजून इतके एकमेकांच्या आयुष्यात ओढले जातो कि कळतच नाही आणि एक दिवस अचानक आपण असलेल्या job च्या frustrationmule दुसरा job पत्करतो ,आहे तो job सोडण्याच्या आनंदात असतो,new job, new envoiurnment ,new people आणि more salary ह्या आनंदात असताना change होणारी ट्रेनचे सोबती आणि change होणारे collegues हे तेव्हा नुसते सोबती तेव्हा राहिलेले नसतात ................आता हे मी कोणाला सांगू?