Wednesday, March 31, 2010

"चायला ते अय्या""चायला तुला एवढा साधा काळात नाही ? दिवसाची सुरुवात झाली कित्तेक जणांचा तोंडात हा शब्द बराच असतोच असतो,चायला हि काही शिवी झाली ? हे सुधा चायला बोलताच बोलतात,मुलांच्या तोंडात तर सर्रास असतातच असतात पण मुलींच्या पण तोंडात असतात शाळा कॉलेजला असल्यापासून मित्र मैत्रिणींमध्ये वापरला जाणारा मराठमोळा शब्द घरात चुकून आई वडिलांसमोर चायलाच्या ऐवजी "अय्या" येतो म्हणजे काळानुसार तो बदलत जातो कॉलेज मध्ये असताना तर हमखास तोंडात तो शब्द होता ,आज कित्तेक वेळा तो शब्द तोंडात कोणासमोर आला कि भाऊ अश्या नझरेने बघणार डोळे मोठे करणार आणि "चायला "चुकून तोंडात आला असा आपण म्हणणार ;) ह्या शब्दाभोवती गुंडाळणार आपलं आयुष्य बघता असताना जाणवतेय आता शाळेत असताना स्नेह संमेलन असताना एखादी नाचाची वा नाटकाची रंगीत तालीम करताना,कॉलेजमध्ये कट्ट्यावर बसताना चिडवताना आणि ज्याला त्रास देतोय तो चोडून बोलणारा त्याच्या तोंडातून हमखास हाच शब्द बाहेर पडतो.आत्ता आत्ता कधीकधी ह्या चायलाची जागा बर्याच वेळा अय्याने घेतली आहे असा क़्वचित वाटत,पण शेवटी चीर तरुणपणा म्हणा वा चिरंजीवी लाभलेला हा "चायला " तुमच्याही आयुष्यात तुम्ही कितीवेळा अनुभवलंय ह्याची गणतीच नसेल.