Sunday, November 27, 2011

तार्यांचे बेट

बऱ्याच दिवसांनी काहीतरी लिहायचा ठरवेले कारण निघालं ते खगोल मंडळ. नेहमी ट्रेकला गेल्यावर रात्री तारे बघत बघत मस्त अंधारात प्रचंड आवडता मला ,पण हे नक्की काय आहेत किती आहेत ?नेमकं विश्व तरी किती आहे ह्या अवकाशाचा हे जाणून घायची इच्छा खगोल मंडळामुळे पूर्ण झाली
शाळेत असताना ह्याबद्दल एवढे प्रश्न मला कधी पडले होते का हेही मला आठवत नाही. पण कळायला लागल्यापासून उत्सुकता वाटायला लागली,कि नक्षत्र कुठेले?ग्रह कुठले? चंद्राची बदलती जागा का असते? तो कुठल्या ग्रहाच्या जवळ कधी असतो?
ह्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली ,ज्यावेळी मृग नक्षत्र बघितला आणि ज्या प्रकारे त्यांनी सांगितला कि त्यात हरिणाचा आकार दिसतोय,त्याला व्याधऋषींनी मारलेला बाण समोरच दिसणारा व्याध तारा,बाजूला दिसणारे रोहिणी नक्षत्र ,जवळ असणारा वृषभ ,त्यात खरच बैलाचाच आकार आहे हे सगळ भासवणारा वे अवकाश मला थक्क करून सोडत होता. तार्यांचे गुच्छा दिसणारे कृतिका अक्षरश: सुंदर दिसत होते.त्यात ब्रम्हारुदय नावाचे सुंदर तारा आहे हे ऐकल्यावर तार्यापेक्षा नावाचाच मला कौतुक वाटत होत.ययाती -देवयानी-शर्मिष्ठा हे त्रिकुट परत एकदा छळून गेले मला .सगळ्यांना त्रासदायक शनी हाच फक्त आम्हाला दिसला नाही.
त्यातल्या त्यात मला एक बर वाटत होत निदान मला गुरु,शुक्र आणि सप्तर्षी हे शाळेत आल्यापासून ओळख येत होते,पण त्या सप्तर्षी मध्ये दडलेला मोठा अस्वल दाखवल्यावर मात्र गम्मतच वाटली कि नक्की किती प्राणी,राशी,तारे,नक्षत्र कसे एकमेकांना धरून आहेत
आज २१व्या शतकात आपण कुठलीही माहिती कशीही मिळाऊ शकतो पण जुन्या काळात तार्यांच्या हालचालींवरून ग्रहांच्या स्थितींवरून झालेल्या वा होणार्या घडामोडींविषयी कसे काय निष्कर्ष लावायचे हे मला न सुटलेला कोड आहे
i know कि बरेच जण वाचून म्हणतील कि इतक्या उशिरा अशा बालिश गोष्टी कशा काय आठवल्या ,थोडा शाळेत अभ्यास केला असता तर कळल्या असत्या कि पण ज्यावेळी तुम्ही चांदण्यांनी,तार्यांनी भरलेल्या आकाशाखाली झोपाल तेव्हा कदाचित तुम्हालाही बर्याच गोष्टी विचार करायला लावेल अशा कित्येक किमया घडवणार हे अवकाश आहे.