Thursday, July 19, 2012
ये रे ये रे पाउसा
पाउस पहिला जणू कान्हुला बरसून गेला बरसून गेला ...................
पाउसाच्या सरी बघत बघत बर्याच जुन्या आठवणींमध्ये मन फिरत फिरत गेलं,शाळेतले दिवस मला एवढे आठवत नाहीत पण कॉलेजमधले आठवतात ,कितीही पाउस पडत असला तरीही आम्ही कॉलेजला जायचो पण ते सगळ्या मित्र मैत्रिणीसाठी LECTURE साठी नाही,सगळा GROUP जमला कि मस्त आमच्या कॉलेज च्या पुढे गांधारी नावाचा एक पूल आहे तो आमचा आवडता स्पॉट होता तिथे आम्ही जायचो आणि पावसात तो इतका सुंदर वाटतो ,आम्ही कॉलेज सोडून ७ वर्ष झाली पण आम्ही अजूनही तिथे जातो पावसात ते माझ सर्वात आवडता ठिकाण आहे . खास पाउसात आम्ही मस्त भिजायला म्हणून बाहेर पडायचो,गरम गरम मका ,कांदा भजी आणि २-४ चहाचे कटिंग आणि पावसात साचलेल्या पाण्यात पाय आपटत सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवत उडवत फिरायची मजा काही औरच आहे.
मी तर अजूनही पावसात भिजायची कारण शोधते ,गाडी वर मस्त रेनकोट न घालता पावसाच्या सारी चेहऱ्यावर जेव्हा येतात ते तर अप्रतिम वाटत.
पाउस हा खर तर बर्याच जणांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ,बर्याच जणांना तो रोमांटिक वाटतो तर बर्याच जणांना तो घरात बसून बघायला आवडतो तर काही जणांना तो कसाही आवडतो , तर काही जणांना तो एवढा आवडत नाही पण त्याची मजा बघयला आवडते.मुंबईमध्ये पाऊस म्हणजे बर्याच जणांना ट्रेनचे प्रोब्लेम नको व्हायला आणि आपण सुखरूप घरी पोहोचाव एवढ्यापुरती पण मर्यादित असतो .
पण पाउसात जाऊन भिजण्यापेक्षा फिरता फिरता आलेल्या पाउसाची मजा जास्त हवीहवीशी वाटते ,आज बर्याच दिवसांनी असा पासून अनुभवायला मिळाला म्हणून एवढंसं लिहावासा वाटला .
Subscribe to:
Post Comments (Atom)
Nice one!!! Thanks for making me remember my days too!! :) kudos!!!!
ReplyDeleteWelcome Abhishek
ReplyDeletetoooooo good praj..... after a long time....
ReplyDelete