Friday, June 18, 2021

Friendship day -2020

आजचा दिवस मैत्रीचा.... खर तर मैत्रीसाठी कोणता वेगळा दिवस नसला तरी खर्या मैत्रीत काहीही फरक पडत नाही अगदी Wish केला नाही तरीही 😊😊😊. माझा मैत्रीचा गोतावळा प्रचंड आहे.... अगदी लहानपणापासुन सांगायचा म्हंटलं तर माझा भाऊ हाच माझा पहिला मित्र म्हणायला पाहिजे.... घरातला पासुन लपूनछपून खेळायचं बर्‍याच गोष्टी एकमेकांशी शेअर करायच्या.... हे होतच पण नंतर भाऊ शिकायला लांब गेल्यावर माझा गोतावळा वाढायला सुरुवात झाली.. सोसायटी मध्ये माझा छान ग्रुप होता... कांचन - केतकी अणि नीरज आमची मजा चालायची, बाकीचे पण होतेच पण ऑगस्ट च्या पाहिल्या रविवारी होणारा friendship day आम्ही अगदी band बांधुन वैगरे करायला लागलो होतो.... अणि शाळा - college मध्ये दुसर्‍या दिवशी... खर तर शाळेत करायचा फॅड तेव्हा navhta6mi कॉलेज मध्ये गेल्यावर करायला लागलो... मला माझी एक मैत्रीण दर्शना हीच आवर्जून नाव घ्यावास वाटतयं कारण आम्ही अगदीच लहानपणापासुन सोबत होतो ते अगदी 10vi पर्यंत... अजूनही amchi मैत्री तशीच आहे.. पण खूप वर्ष आम्ही एकत्र घालवली आहेत. जी अजुनहि स्मरणात आहेतच...अणि तृप्ती परदेशी शाळेतली खास मैत्रिण हिच्यासोबत रोज संध्याकाळी टिळक चौक ते शिवाजी चौक असा फेरफटका मारायला जायचे. त्यानंतर कॉलेज मध्ये पाय टाकल्यावर मग तर काय मित्र मैत्रिणींची रेलचेल खर तर सुरू झाली... अभ्यास सोडून सगळे काही ह्या कॉलेजमध्येच होतं.. भांडण करता करता कधी मैत्री होते चांगली हे कळतच नाही... कांचन, ज्योती, नीलू, Viyati संकेत शाहिद अणि मयांक ज्याच्याशी पाहिले जाम भांडायचे अजुनहि भांडत असते.... आमच्या खरच खूप सार्‍या आठवणी आहेत छेडछाडीच्या, मारामारीच्या अणि सोबत अभ्यास करायच्या पण.. मग आमचा ग्रुप वाढताच गेला. मधु, श्रद्धा, मनीष, वरुण अणि अजून बरेच जण त्यात मला mazha मित्र वरुण ह्याने त्याच्या gf chi भेट घालून दिलेली स्वप्न गंध जी आता त्याची बायको आहे माझ्याहून लहान आहे पण त्या नंतर त्याच्यापेक्षा जास्त माझी ती मैत्रीण कशी झाली कळलच नाही.... खूप फिरायचो आम्ही.. College संपून मग आमचे स्वतंत्रपणे सगळ्यांचे एक एक जिवन सुरू झाले नोकरी, व्यवसाय सगळे नवीन झालेल्या काही जुन्या अशा मित्र मैत्रिणीसोबत फिरू लागले.... मग माझे ग्रुप वाढू लागले... सकाळच्या ट्रेन चा ग्रुप जी लिस्ट खूप मोठी आहे सोनाली, मानसी जी train पकडून विंडो सीट पकडायची अणि मला द्यायची, क्षिप्रा, मेघना तृप्ती ऑफिस ग्रुप अश्विनी, sannow, Chaitra... हा office group tase अजून पण आहे पण आमचा हा खास चंबू.. ताशी धनू.. आमची DJ ही एक संवेदनशील मैत्रीण मला लाभली. नंतर ट्रेकिंग chi आवड निर्माण झाली तिथे परत सोनाली अणि माझी एक veglich मैत्री निर्माण झाली, जिला त्रास द्यायची एक सवयच लागली होती पण ती पण ते खूप एन्जॉय करायची आम्ही सोबत भटकला जायचो जाम तिच्यामुळेच मला रुपाली भेटली, तिला भेटल्यावर ही मुलगी कमालीची innocent होती मग काय amchi एक. Jodich जमली होती,संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर कल्याण स्टेशन la भेटल्यावर गाडी घेऊन सगळीकडे हुंदडत (खादाडी अणि shopping) आम्ही घरी जायचो ट्रेकचा ग्रुप पण मोठा होता तेजस, मनीष सर ही महत्त्वाची नाव 8-10 आम्ही जायचो ट्रेक la... Actually मला भटकायचो सवय लागली कारण कॉलेज संपल्यावर माझ्या बर्‍याच मित्र मैत्रिणीची लग्न झालेली होती.. अणि 3-4 वर्ष मी मनसोक्त भटकंती केली... नंतर माझ पण लग्न ठरलं.... अणि एक हक्काचा नवरा कम मित्राच भेटला... त्याचा गोतावळा फारसा नव्हता माझ्यासारख्या पण जो होता म्हणजे अजुनहि आहेच to पण एक ekfum खासच... जयेश, आदित्य, चैतन्य अणि कौस्तुभ ase हे अणि त्याच्या सगळ्यांच्या सौ सानिका, गौरी, आदिती अणि मीनल असा ata आमचा एक ग्रुप जो एकत्र आहे.... आम्ही 2 वर्षापूर्वी बंगलोर la आलो अणि मला वाटला आता काय कोणी मैत्रिणी नाही की कोणी नाही इथे.. पण ज्यांना सवयच असते मित्र मैत्रिणी मध्ये रहायची ते कुठेही आपली टीम उभी करू शकतात so इथे पण मला बंगलोर मराठी मैत्रिणी भेटल्या.. आमच्या society मध्ये 30-40 जणांचा मराठी ग्रुप आहे.. त्यात mazhya खास म्हणजे वृषाली, रुपाली, Khushboo, भाग्यश्री, पल्लवी, NonIka, geeta, pranjal....ज्यांच्याशी मी. कधीही अणि काहीही बोलू शकते खर तर माझ्या मित्र मैत्रिणीची लिस्ट भरपूर आहे पण त्या khasam खास लोकांची नाव आवर्जून घ्यावेसे वाटते.. त्यांच्यासाठी हे sagla लिहिले आहे.. ह्यात बर्‍याच जणांची नाव जरी मी घेतली नसतील तरी पण ती पण खास आहेतच 😊😊 काहीजण म्हणतात मित्र मैत्रीण कमी असेल तरी चालतील पण खास असावेत पण मला असा वाटत नाही प्रत्येक माणूस कधी तुमचा जवळ येऊन काही ना काही खास जागा मनामध्ये बनवत असतो ते तात्पुरता नक्कीच नसता अणि जी व्यक्ति तुम्हाला भेटते ती नवीन काही ना काही नक्कीच शिकवते.... सगळ्याना मैत्री दिनाच्या शुभेच्छा प्राजक्ता...

Monday, November 25, 2013

भटकंती …….

मला भटकंती ची आवड लग्नापूर्वीपासूनच होती पण लग्न झाल्यावर जोडीदाराची त्या आवडीला जोड मिळाली त्यामुळे आम्ही प्रत्येक वीकेंडला पुण्याजवळच्या दुर्मिळ,ऐतिहासिक अशा अनेक जागेला जाऊन आम्ही भेट देतो. पुण्याच्या जवळपास अशी अनेक ठिकाणे आहेत जी एका दिवसात पार करून आपण परत घरी जेवायला येऊ शकतो . मी पाहिलेल्या अशातल्या एका ठिकाणाची मला थोडीशी माहिती आज सांगावीशी वाटते ती जागा म्हणजे लिंब - शेरी येथील १५ मोटांची विहीर. हि शिवपिंडीच्या आकाराची आणि षटकोनी ऐतिहासिक अशी विहीर पुण्याहून सातराच्या अलीकडे १३ कि .मी नागेवाडी नावाचे एक गाव आहे तिथून पूर्वेकडे २ कि .मी वर लिंब नावाचे गाव आहे तिथे लिंब-शेरी वाडीत हि विहीर आहे . हि विहीर बघितल्यावर असा वाटतच नाही कि एखाद्या विहिरीमागे सुद्धा इतिहास असू शकतो आम्ही शहरी जीवनात कायम राहिलेलो विहीर म्हणजे दगड मारून पाण्याचा आवाज ऐकण्या पुरतीच केलेली गम्मत. हि विहीर शं भू पु त्र शिवाजी ह्यांच्या पत्नीने म्हणजे वीरुबाई ह्यांनी इ . स . १ ७ १ ९ ते १ ७ २ ४ ह्या काळात बांधली . ह्या षटकोनी आकाराच्या विहिरीला उतरणाऱ्या पायऱ्यांवरील दारावर एक सुंदर गणपती कोरलेला आहे ,या पाय ऱ्या वरचा कमानदार पूल आणि त्याला जोडीचे माडीवजा बांधकाम भक्कम आणि तिथल्या खांबावरचे मोर ,फ़ुल ,गणपती,घोडेस्वार ,कुस्ती करणारे पैलवान ,चक्रे हि शिल्प क्षवेधी आहेत .विहिरीच्या वरील भागात वाघ - सिंह ह्यांची शिल्प आहेत. एकदातरी आवर्जून हि १ ५ मोटांची विहीर बघावी . अतिशय शांत जागा बाजूला एक सुंदर पार असलेला मोठा झाड आहे तिथे बसून समोर असलेल्या विहीर तुम्हाला मागच्या काळात थोड्या वेळासाठी तरी नक्कीच घेऊन जाते .

Thursday, July 19, 2012

ये रे ये रे पाउसा

पाउस पहिला जणू कान्हुला बरसून गेला बरसून गेला ................... पाउसाच्या सरी बघत बघत बर्याच जुन्या आठवणींमध्ये मन फिरत फिरत गेलं,शाळेतले दिवस मला एवढे आठवत नाहीत पण कॉलेजमधले आठवतात ,कितीही पाउस पडत असला तरीही आम्ही कॉलेजला जायचो पण ते सगळ्या मित्र मैत्रिणीसाठी LECTURE साठी नाही,सगळा GROUP जमला कि मस्त आमच्या कॉलेज च्या पुढे गांधारी नावाचा एक पूल आहे तो आमचा आवडता स्पॉट होता तिथे आम्ही जायचो आणि पावसात तो इतका सुंदर वाटतो ,आम्ही कॉलेज सोडून ७ वर्ष झाली पण आम्ही अजूनही तिथे जातो पावसात ते माझ सर्वात आवडता ठिकाण आहे . खास पाउसात आम्ही मस्त भिजायला म्हणून बाहेर पडायचो,गरम गरम मका ,कांदा भजी आणि २-४ चहाचे कटिंग आणि पावसात साचलेल्या पाण्यात पाय आपटत सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवत उडवत फिरायची मजा काही औरच आहे. मी तर अजूनही पावसात भिजायची कारण शोधते ,गाडी वर मस्त रेनकोट न घालता पावसाच्या सारी चेहऱ्यावर जेव्हा येतात ते तर अप्रतिम वाटत. पाउस हा खर तर बर्याच जणांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ,बर्याच जणांना तो रोमांटिक वाटतो तर बर्याच जणांना तो घरात बसून बघायला आवडतो तर काही जणांना तो कसाही आवडतो , तर काही जणांना तो एवढा आवडत नाही पण त्याची मजा बघयला आवडते.मुंबईमध्ये पाऊस म्हणजे बर्याच जणांना ट्रेनचे प्रोब्लेम नको व्हायला आणि आपण सुखरूप घरी पोहोचाव एवढ्यापुरती पण मर्यादित असतो . पण पाउसात जाऊन भिजण्यापेक्षा फिरता फिरता आलेल्या पाउसाची मजा जास्त हवीहवीशी वाटते ,आज बर्याच दिवसांनी असा पासून अनुभवायला मिळाला म्हणून एवढंसं लिहावासा वाटला .

Sunday, November 27, 2011

तार्यांचे बेट

बऱ्याच दिवसांनी काहीतरी लिहायचा ठरवेले कारण निघालं ते खगोल मंडळ. नेहमी ट्रेकला गेल्यावर रात्री तारे बघत बघत मस्त अंधारात प्रचंड आवडता मला ,पण हे नक्की काय आहेत किती आहेत ?नेमकं विश्व तरी किती आहे ह्या अवकाशाचा हे जाणून घायची इच्छा खगोल मंडळामुळे पूर्ण झाली
शाळेत असताना ह्याबद्दल एवढे प्रश्न मला कधी पडले होते का हेही मला आठवत नाही. पण कळायला लागल्यापासून उत्सुकता वाटायला लागली,कि नक्षत्र कुठेले?ग्रह कुठले? चंद्राची बदलती जागा का असते? तो कुठल्या ग्रहाच्या जवळ कधी असतो?
ह्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली ,ज्यावेळी मृग नक्षत्र बघितला आणि ज्या प्रकारे त्यांनी सांगितला कि त्यात हरिणाचा आकार दिसतोय,त्याला व्याधऋषींनी मारलेला बाण समोरच दिसणारा व्याध तारा,बाजूला दिसणारे रोहिणी नक्षत्र ,जवळ असणारा वृषभ ,त्यात खरच बैलाचाच आकार आहे हे सगळ भासवणारा वे अवकाश मला थक्क करून सोडत होता. तार्यांचे गुच्छा दिसणारे कृतिका अक्षरश: सुंदर दिसत होते.त्यात ब्रम्हारुदय नावाचे सुंदर तारा आहे हे ऐकल्यावर तार्यापेक्षा नावाचाच मला कौतुक वाटत होत.ययाती -देवयानी-शर्मिष्ठा हे त्रिकुट परत एकदा छळून गेले मला .सगळ्यांना त्रासदायक शनी हाच फक्त आम्हाला दिसला नाही.
त्यातल्या त्यात मला एक बर वाटत होत निदान मला गुरु,शुक्र आणि सप्तर्षी हे शाळेत आल्यापासून ओळख येत होते,पण त्या सप्तर्षी मध्ये दडलेला मोठा अस्वल दाखवल्यावर मात्र गम्मतच वाटली कि नक्की किती प्राणी,राशी,तारे,नक्षत्र कसे एकमेकांना धरून आहेत
आज २१व्या शतकात आपण कुठलीही माहिती कशीही मिळाऊ शकतो पण जुन्या काळात तार्यांच्या हालचालींवरून ग्रहांच्या स्थितींवरून झालेल्या वा होणार्या घडामोडींविषयी कसे काय निष्कर्ष लावायचे हे मला न सुटलेला कोड आहे
i know कि बरेच जण वाचून म्हणतील कि इतक्या उशिरा अशा बालिश गोष्टी कशा काय आठवल्या ,थोडा शाळेत अभ्यास केला असता तर कळल्या असत्या कि पण ज्यावेळी तुम्ही चांदण्यांनी,तार्यांनी भरलेल्या आकाशाखाली झोपाल तेव्हा कदाचित तुम्हालाही बर्याच गोष्टी विचार करायला लावेल अशा कित्येक किमया घडवणार हे अवकाश आहे.

Monday, October 4, 2010

"Space "

" Come on please इ need some space in my life " हे वाक्य आपण कितीतरी वेळा बोलतो बरेचजण मनात बोलतात तर काहीजण समोर बोलतात आणि काही जण follow करतात किंवा करायचा प्रयत्न तरी करतात. आज एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारे सर्वजण एकमेकांना प्रत्येकाची माहिती असलीच पाहिजे बारीक हाल्चालीसुद्धा माहित असल्याच पाहिजे असा अट्टाहास ठेवणारे आणि कधीकधी ,बरेचवेळा काळजीपोटी माहित असल्या पाहिजे असा मानतात.पती-पत्नी त्यांना तर एकमेकांची ओळख betterhalf म्हणूनच असते.पण बऱ्याचवेळा असा विचार केला तर मला असा वाटत ह्यापैकी प्रत्येकानं खूप वेळा आपली स्वतःची space हवी असते ,म्हणजे आपला एखादा स्वतंत्र आयुष्य ,स्वतंत्र विचार असावा जो ह्यापैकी कोणालाही माहित नसावा ते इतका personnel असावा कि त्याबाबत you should answerable only yourself आज घरात राहणाऱ्या स्त्रीला,म्हाताऱ्या माणसाला,अपंग व्यक्तीला नोकरी करणाऱ्या कोणालाही कितीतरी वेळा असे विचार येत असतीलच ना कि माझ्या आयुष्यात मला येणाऱ्या अनेक विचारांबाबत मी कोणाशीही चर्चा करू नये मी असा काहीही आणि तसाच स्वतःला समाधानकारक स्वतःला आवडणारं माझ्यामुळे एखाद्याला नकळत आनंद देणारं असा काहीही स्वच्छेने करावा आणि तेही असा विचार करून कि " It's my life & I need some space for that and I should not answerable to anyone " Is that possible?
मी म्हणेन हो शक्य आहे.मी हा विचार येथे मुद्धाम मांडायचा प्रयत्न करतेय त्या लोकांसाठी ज्यांना खरच असा वाटत असता कि आपण आपल्यासाठी वा आपल्याला येणारे विचार वा आपण स्वतःला समाधानकारक जे काही करतोय ते योग्य करतोय पण ह्याबद्दल मला कोणाला सांगायची इच्छा पण नाहीये मी त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न करतेय.आणि असे विचार करणारे खूप जण मी माझ्या आजूबाजूला बघितले आहेत.आई-वडिलांनी त्यांचे निर्णय मुलांवर थोपवायचे or मुलांनी त्यांचे विचार आई-वडिलांवर सांगायचे मित्र मैत्रीणीत ,पती-पत्नी ह्या सगळ्यांमध्ये एकमेकांना देणारी space हि वेगळी असते आणि स्वःताने स्वतःसाठीच निवडलेली space हि वेगळी असते.
तुम्हीही एकदा प्रयत्न करून बघा खरच तुम्हाल तुमची "space " निवडता येतेय का ते ?

Friday, July 30, 2010

मैत्री...

"लक्षात ठेव दोस्ता,तुला मी हवा आहे म्हणूनच मला तू हवा आहेस " वपुर्झा मधलं वाक्य आहे.आयुष्यात प्रत्येक नात गरज म्हणून नसत पण मैत्रीची गरज कायम असते ,ज्यात सगळी नाती तुम्हाला अनुभवायला मिळतात.छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणं ,रुसवे फुगवे,थट्टा-मस्करी ,आणि न सुटणाऱ्या गुंतागुंतीच पण प्रेमळ नातं असतं.पण त्यात गरजेपुरती असणारी मैत्री नको.
बरेच जण असा म्हणतात कि "A Friend in need a Friend indeed " पण मला असा वाटत त्यानंतर ती गरज टिकवून ठेवणं ती मैत्री.बर्याच जणांच्या आयुष्यात असे क्षण येतात कि त्याला खरच एका आधाराची गरज असते त्यावेळी आधार बनणं ती मैत्री आणि तोच आधार सतत गरज बनत जाण तीपण मैत्रीच.
सगळ्याच गर्दीला आपलंसं करता येत नाही आणि सगळ्या गर्दीत आपण सामील होऊ शकत नाही काहीजण असा करूही शकतात पण ते स्वतःचा स्वार्थ म्हणून करतात.ते कधीच मैत्री जाणू शकत नाहीत.आपला मार्ग आपण निवडायचा आहे.मैत्रीत आलेले क्षण कसे टिपून ठेवायचे ,कसे जपायचे,आणि कसे टिकून ठेवायचे, गरज असताना आधार देण कि आधाराची गरज असताना ती शोधण का आधाराची गरज असताना जी सोबत मिळाली आहे ती कायम जपून ठेवणं.

Happy Friendship Day

Sunday, July 18, 2010

माझे श्रद्धास्थान......

सकाळी ट्रेनमध्ये ऐकलं अगं आज अंगारखी चतुर्थी नाही का? म्हणून titwalyala जाऊन आले दर चतुर्थीला जाते ना मी, हे ऐकून वाटलं अरे लोकांची किती श्रद्धा आहे?दर वेळी न चुकता हि बाई जाते वा छान,पण नंतरच तिचा वाक्य ऐकून माझा लगेच लोक किती बाउ करतात ह्या गोष्टींवरचा विश्वास ह्या बाईने कायम ठेवला,ती म्हणाली सकाळी titwalyala जायचा घाईत "मी सकाळी देवाला नमस्कार करायचा विसरूनच गेले" लोकांना घरातल्या देवासमोर ५ मिनिट उभे राहून नमस्कार करायला वेळ नाही मग हे मंदिरात जाऊन स्वतः किती श्रद्धाळू आहेत असा का दाखवतात किंवा हे असं करून देव पाऊ शकतो? मला तर असं वाटत कि लोक मानसिक समाधानापेक्षा नवस बोलण्यासाठी वा काही ना काही मागण्यासाठी देवस्थानांना भेटी देतात.लोक ह्या ना त्या जोतीष्यांकडे जाऊन त्यांनी सांगितलेले उपाय म्हणून आणि बरेच वेळा स्वतःसाठी काही ना काही मागण्यासाठी मंदिरात जातात पण काही काही लोक मानसिक समाधानासाठी अशा श्रद्धास्थानी जाऊन येतात पण आजकाल ह्या तीर्थस्थानी लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला जातो हे कितपत योग्य आहे?लालबागचा राजा असो,शिर्डी असो,तिरुपती असो,मुंबईचा सिद्धिविनायक असो लोकांना १०-१२ तास खिळवत ठेवलं जातं ५ मिनटांच्या दर्शनासाठी,VIP line ,मुखदर्शन,आणि फक्त पाया पडण्यासाठी आलेले लोक ह्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या आणि लांबलचक रांगा लागलेल्या असतात .हे सगळं कशासाठी?कोणासाठी? देवाला भेटण्यासाठी का स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी? का हि संस्थान चालवण्यासाठी? का स्वतःच्या मानसिक समाधानासाठी?

आज तुम्ही तुमच्या देवघरात एकदा निरखून बघा हि एवढी संस्थान आहेत तेवढे सगळे देव तुमच्या समोर असताना तुम्ही तुमची वाट अशी का बदलता? मला असं म्हणायचा नाहीये कि देवळात जाऊन तरी काय होता ?तुमच्या इच्छेने तुम्ही देव माना,मनापासून माना,आज ह्या गुरुजींनी सांगितला म्हणून आज ह्या देवळात जातेय /जातोय ,हे अस सांगितल्यावर यश तुमच्या पदरात पडेल ?तुमच्या देवघरात जो गणपती आहे तोच सिद्धिविनायकला आहे,तोच गणपतीपुळ्याला आहे आणि तोच लालबागचा राजा आहे,फक्त तुमचा श्रद्धास्थान तुम्ही निवडायचा आहे
मला इथे आस्तिक-नास्तिक हा मुद्दा अजिबात उभा करायचा नाहीये. मला इथे ह्या श्रद्धास्थानानी मांडलेल्या लोकांच्या श्रद्धेच्या बाजाराची चीड आहे.
देव कधी सांगत नाही मला हे हव आहे ते हवा आहे ,पण आपापल्या परीने आणि आपापल्या मनापासून असलेल्या श्रद्धेने जे काही लोक देवासाठी करतात त्याच्या बाजार मांडला जाऊन नये एवढंच माझं म्हणणं आहे .ह्यानंतर तुम्ही तुमचं श्रद्धास्थान निवडायचा आहे.