Monday, November 25, 2013

भटकंती …….

मला भटकंती ची आवड लग्नापूर्वीपासूनच होती पण लग्न झाल्यावर जोडीदाराची त्या आवडीला जोड मिळाली त्यामुळे आम्ही प्रत्येक वीकेंडला पुण्याजवळच्या दुर्मिळ,ऐतिहासिक अशा अनेक जागेला जाऊन आम्ही भेट देतो. पुण्याच्या जवळपास अशी अनेक ठिकाणे आहेत जी एका दिवसात पार करून आपण परत घरी जेवायला येऊ शकतो . मी पाहिलेल्या अशातल्या एका ठिकाणाची मला थोडीशी माहिती आज सांगावीशी वाटते ती जागा म्हणजे लिंब - शेरी येथील १५ मोटांची विहीर. हि शिवपिंडीच्या आकाराची आणि षटकोनी ऐतिहासिक अशी विहीर पुण्याहून सातराच्या अलीकडे १३ कि .मी नागेवाडी नावाचे एक गाव आहे तिथून पूर्वेकडे २ कि .मी वर लिंब नावाचे गाव आहे तिथे लिंब-शेरी वाडीत हि विहीर आहे . हि विहीर बघितल्यावर असा वाटतच नाही कि एखाद्या विहिरीमागे सुद्धा इतिहास असू शकतो आम्ही शहरी जीवनात कायम राहिलेलो विहीर म्हणजे दगड मारून पाण्याचा आवाज ऐकण्या पुरतीच केलेली गम्मत. हि विहीर शं भू पु त्र शिवाजी ह्यांच्या पत्नीने म्हणजे वीरुबाई ह्यांनी इ . स . १ ७ १ ९ ते १ ७ २ ४ ह्या काळात बांधली . ह्या षटकोनी आकाराच्या विहिरीला उतरणाऱ्या पायऱ्यांवरील दारावर एक सुंदर गणपती कोरलेला आहे ,या पाय ऱ्या वरचा कमानदार पूल आणि त्याला जोडीचे माडीवजा बांधकाम भक्कम आणि तिथल्या खांबावरचे मोर ,फ़ुल ,गणपती,घोडेस्वार ,कुस्ती करणारे पैलवान ,चक्रे हि शिल्प क्षवेधी आहेत .विहिरीच्या वरील भागात वाघ - सिंह ह्यांची शिल्प आहेत. एकदातरी आवर्जून हि १ ५ मोटांची विहीर बघावी . अतिशय शांत जागा बाजूला एक सुंदर पार असलेला मोठा झाड आहे तिथे बसून समोर असलेल्या विहीर तुम्हाला मागच्या काळात थोड्या वेळासाठी तरी नक्कीच घेऊन जाते .

No comments:

Post a Comment