Monday, May 10, 2010

" मी " पणा,अहंकार आणि self respect

" मी " पणा,अहंकार आणि self respect ह्यात कितीसा फरक आहे असा तुम्हाला वाटतं,मला कधी कधी ह्याचं अर्थ एकाच वाटतो.आता तुम्ही म्हणाल कि कसा काय ?self respect म्हणजे स्वतच्या अस्थित्वाची,स्वताच्या मूल्यांसाठी चालणारी धडपड,प्रयत्न. म्हणजे काय शेवटी स्वतःचा विचार करूनच ना........मी पणा मध्ये फक्तस्वतःच्या मनाचा विचार केला जातो ,माझे विचार,माझी तत्व,माझ्या मर्यादा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतरांनी पण तेच मान्य केले पाहिजेत असा अट्टाहास.आणि तोही by hook or crook मग त्या चुकीच्या असल्या तरी चालेल.
मी असा म्हणत नाही कि ह्या सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत म्हणून ........नाहीच आहेत कारण self respect म्हणजे आपण करतोय त्या गोष्टी चुकीच्या नाहीयेत आणि त्या गोष्टींसाठी विरोधात जाणं. आता प्रश्न आहे अहंकाराचा तो मी पानाच्या फारच जवळ आहे..आपला कसाही असणारं अस्थित्व समोरच्याने कायम गणतीत घेतला पाहिजे ह्याचा चुकीचा हट्ट,आणि त्याच भ्रमात राहून आयुष्य जगणं. असा मला वाटतं
ह्या गोष्टी साधारण किती भिन्न आहेत हे मला कोड आहे ,तुमच्याकडे ह्याच उत्तर आहे ?

2 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. खूप भिन्न आहेत..मी पणा आणि अहंकार हातत हात घालून येतात... मला जे समजलय त्यातून हे कोड सोडवायचा प्रयत्न.

  मी पणा - मी सांगीतल होत ना तसच झाल,दूसर्या व्यक्तीला स्वतासारखा बनवण्याच प्रयत्न

  अहंकार - हे फक्त मीच करु शकतो

  Self Respect - स्वताबद्दलचा आदर - उलट सूलट बिनबूडाच्या गोष्टी ऐकून न घेता त्याला विरोध करणे

  ReplyDelete